आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामूलपूर स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेचे 20 ते 23 मार्च या कलावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 11 देशांचे संघ मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाच्या निवड समिती सदस्यपदी छत्रपती संभाजीनगरच्या अॅड. गोविंद शर्मा यांची निवड करण्यात आल्याची माहिती खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व सेक्रेटरी एम. त्यागी यांनी दिली आहे.
या स्पर्धेत यजमान भारतासह, बांगलादेश, नेपाळ, भुतान, मलेशिया, इंडोनेशिया, इराण, इराक, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका आदि देशांचे संघ आपले कौशल्य पणाला लावतील. त्याचबरोबर, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियानच्या वतीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील काही महत्वाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व पंच प्रमुख भूमिका बजावणार आहेत. महाराष्ट्राचे महेश पालांडे यांची भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. प्रशांत पाटणकर पंच मंडळ प्रमुख व संतोष सावंत व गंधाली पलांडे हे पंच म्हणून या स्पर्धेत काम पाहणार आहेत. तसेच अमित राव्हटे यांची फिजिओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुषमा गोळवलकरांना संधी
या स्पर्धेत सहभागी होणारा भारतीय संघ निवड समिती सदस्य म्हणून मुन्नी जॉन, एम. एस. मलिक, सुमित भाटीया, सुषमा गोळवलकर व सी. मनोहर यांची सुद्धा निवड झाली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी गोव्याचे लीमा लुईस यांची तांत्रित समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी झालेल्या तिन्ही आशियाई खो-खो स्पर्धांमध्ये विविध पदांवर काम केले होते.
भारत विजेतेपदाचा दावेदार
या स्पर्धेत बलाढ्य भारतासह दहा देश सहभागी होणार असून स्पर्धेत भारताचे पारडे नक्कीच जड आहे. भारत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे. संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा स्थान देण्यात येणार आहे. यजमान आल्याने घरच्या मैदानावर आपल्याला फायदा होईल, असे मत निवड समिती सदस्य अॅड. गोविंद शर्मा यांनी व्यक्त केले. शर्मा हे महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.