आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग काॅलेजला सन्मान:दिल्लीतील संस्थेकडून ,सर्वोत्कृष्ठ अभियांत्रिकी महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली' या संस्थेने सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय 2022 या वर्षीचा पुरस्कार औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयास देऊन सन्मानित केले.

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली ही देश पातळीवरील अभियांत्रिकी क्षेत्रातील राष्ट्रीय संस्था आहे. औद्योगिक क्षेत्राला लागणारे तांत्रिक कुशल मनुष्यबळ विकसित करणे व नवनवीन तंत्रज्ञानाची शैक्षणिक क्षेत्राशी सांगड घालणे. या प्रमुख उद्देशाने 1941 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

भारतातील अडीच हजारांपेक्षा जास्त संस्था (IITs, IISCs, NITs आणि इतर अग्रमानांकित तंत्रज्ञान महाविद्यालय व संस्था), एक लाखांपेक्षा जास्त तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक तसेच पाच लाखांपेक्षा जास्त अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी या राष्ट्रीय संस्थेचे सभासद आहेत. सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय या पुरस्कारासाठी छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने राबविलेल्या शैक्षणिक, सामाजिक, तंत्रज्ञान विषयक तसेच नाविन्यता, संशोधन, उद्योजकता विकास आणि कॅम्पस प्लेसमेंट या विविध उपक्रमामुळे हा मानाचा बहुमान महाविद्यालयास प्राप्त झाला आहे.

ISTE च्या 51 व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात 27 ऑगस्ट 2022 रोजी गोवा येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडिएशनचे (NBA) चेअरमन प्रा. के. के. अग्रवाल आणि ISTE चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे म्हणाले की, या पुरस्कारातून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन भविष्यात अधिकाधिक समाजाभिमुख व देशोपयोगी उत्कृष्ट मेहनती अभियंते घडविण्याचे कार्य अधिक जोमाने करणार आहोत. संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर आणि जनसंपर्क अधिकारी संजय पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...