आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीप सोळुंके यांचे प्रतिपादन:शिवराय हे समाज तोडण्याचे नव्हे, समाज जोडण्याचे प्रतीक

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. अठरा पगड जातींच्या हिताचे रयतचे लोकोपयोगी राज्य निर्माण केले होते. म्हणून शिवराय हे समाज तोडण्याचे नव्हे समाज जोडण्याचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांनी केले.

सिल्लोड तालुक्यातील बोरगावात ( कासारी ) राजे ग्रुप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सोळुंके बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. मा. सभापती शंकरराव जाधव, जि प सदस्य ज्ञानेश्वर मोटे, अॅड. विजय मंडलेचा, सुखदेवराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर जाधव, सरपंच दत्ता मोटे, आदी उपस्थिती होते.

शिवरायांचे पुस्तक घरात आहे का?

पुढे बोलताना सोळुंके म्हणाले की, छत्रपतीचे पुतळे गावगाव उभारले जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण शिवरायांचे एखादे पुस्तक घरात आहे का? या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता कोणी ठेवायची?, गावात महिलांचा आपण सन्मान करतो का? याचेही चिंतन व्हावे. या प्रसंगी विनोद पाटील यांनी गावात पुतळा उभारत असाल तर सर्व परवानग्या मिळवून देऊ, अशी ग्वाही याप्रसंगी दिली. या कार्यक्रमास गावातील सर्व धर्म, जातींचे लोक उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...