आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे आवाहन:आरक्षण मिळेपर्यंत विद्यार्थ्यांनी सारथी संस्थेच्या माध्यमातून विविध सेवासवलतींचा लाभ घ्यावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी गुरुवारी कोल्हापूरातील सारथी संस्थेच्या उपकेंद्राला भेट देऊन कामकाजाबद्दल माहिती घेतली. तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत गोरगरीब मराठा विद्यार्थ्यांनी सारथीच्या विविध योजना व सेवासवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केले आहे.

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेल्या व आरक्षणा बरोबरच महत्त्वपूर्ण असलेल्या या संस्थेबाबत अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीमध्ये संधी उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे सारथीच्या माध्यमातून दर्जेदार व उच्च शिक्षण घेण्यास मराठा विद्यार्थ्याना सेवासवलती मिळतात. विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवू शकणारे अनेक कोर्स सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी मोफत अनमोल प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. शिक्षणाबरोबरच राहणे, खाण्यासाठी अर्थसाहाय्य देण्याची तरतूद केली आहे.

आरक्षण मिळेपर्यंत सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक सवलतींचा लाभ मिळू शकतो, हे लोकांना पटवून देणे, विविध योजनांची माहिती देणे, यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त होणे गरजेचे आहे. सारथीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींसह प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, कॉलेजच्या माध्यमातून लोकांमध्ये संस्थेच्या कार्याविषयी व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ याविषयी जनजागृती करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, कोल्हापूर येथील सारथीच्या उपकेंद्रासाठी १९६ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच सुसज्ज इमारतीचे काम सुरू होणार आहे. यावेळी सारथीसह अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याही समस्या यावेळी जाणून घेतल्या. सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे व त्यांचे लाभ समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावेत, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.

विभागीय इमारतींचे कामे

सारथी संस्थेचे विभागीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेथे जागा मिळाली तेथील इमारत बांधकाम सुरू करून वेळेत पूर्ण झाली पाहिजे. जेथे जागा मिळाली नाही तेथे त्या लवकर मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...