आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी-20 स्पर्धा:एकता अकादमीचा विजय, कर्णधार रणजीतची चमकदार कामगिरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लकी क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित आझाद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत एकता क्रिकेट अकादमीने इर्शाद संघावर 5 गडी राखून मात केली. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रणजीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इर्शाद संघाने 20 षटकांत 8 बाद 125 धावा उभारल्या. यात सलामीवीर राम राठोडने 24 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचत 30 धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर जावेद पटेल शुन्यावर बाद झाला. आर्यन डांगे 1 व रिझवान 1 धावेवर परतला. सिकंदर मेमनने 25 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 16 धावा केल्या. हर्ष कीर्तिकरने सर्वाधिक नाबाद 41 धावा काढल्या. त्याने 40 चेंडूंत 4 चौकार खेचले. अभिषके दापकेने 11 धावा जोडल्या. इम्रान पटेल चार धावांवर नाबाद राहिला. एकताकडून कर्णधार रणजीतने 1 2धावा देत 2 गडी बाद केले. लहु लोहार व मनोज ताजीने प्रत्येकी एक एक बळी घेतला.

सुनीलची विजयी संयमी खेळी

प्रत्युत्तरात एकता अकादमीने 18.2 षटकांत 5 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर सुनील काळेने नाबाद 38 धावांची विजयी खेळी केली. या खेळीत त्याने संयमी फलंदाजी केली. त्याने 50 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार खेचले. दुसरा सलामीवीर ओंकार ठाकूरने 14 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार लगावत 16 धावा केल्या. अंकित मिश्राने 17 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार मारत 21 धावा काढल्या. मनोज ताजी भोपळाही फोडू शकला नाही. कर्णधार रणजीतने 8 चेंडूंत 2 षटकारांच्या मदतीने 12 धावा जोडल्या. सुरज वाघ 11 धावांवर नाबाद राहिला. एकताकडून अभिषेक दापकेने 25 धावा देत 2 बळी घेतले. राम राठोडने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...