आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:मुख्य शिक्षण सचिवांची नारेगाव शाळेला भेट

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्याचे मुख्य शिक्षण सचिव रणजितसिंह देओल औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या नारेगाव माध्यमिक मराठी व उर्दू शाळेस भेट दिली. याप्रसंगी शिक्षण सल्लागार सिद्धेश वाडकर, उपसंचालक अनिल साबळे, उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, संजीव सोनार, रमेश ठाकूर, रामनाथ थोरे, भरत तीनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे लेझीम पथकाने व औक्षण करून स्वागत केले. मुख्याध्यापिका संगीता ताजवे व अब्दुल रहीम शेख यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. याप्रसंगी उपायुक्त नंदा गायकवाड यांनी मनपा शिक्षण विभागाची माहिती सांगितली. रणजितसिंह देओल यांनी शाळेमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

नवीन खोल्यांच्या बांधकामासाठी व इतर सुविधांसाठी निधी कमी पडत असल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. शाळेमध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेल्या अण्णामृत फाउंडेशनच्या खिचडीचा सर्वांनी आस्वाद घेतला. याप्रसंगी रणजितसिंह देओल यांनी वर्गात जाऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...