आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांची मुंबई येथील सांघिक कार्यालयात बदली झाली आहे. त्यानिमित्त परिमंडल कार्यालयातर्फे त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. तर त्यांच्या जागी सचिन तालेवार रुजू होणार आहेत.
यावेळी परिमंडल कार्यालयासह सर्व मंडल, विभाग, उपविभाग कार्यालये तसेच कर्मचारी-कामगार संघटनांच्या वतीने मुख्य अभियंता खंदारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे (औरंगाबाद शहर मंडल), संजय सरग (पायाभूत आराखडा विभाग), प्रवीण दरोली (औरंगाबाद ग्रामीण मंडल), मोहन काळोगे (स्थापत्य मंडल), सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता (प्रशासन) दीपक सोनुने, कार्यकारी अभियंता सतीश खाकसे (शहर मंडल), जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, सहायक अभियंता सचिन लालसरे, श्याम मोरे, लघुलेखक वराडे, संघटना प्रतिनिधी म्हणून राजेंद्र राठोड, अरुण पिवळ, विनय घनबहादूर, पांडुरंग पठाडे, श्रावण कोळनूरकर, अक्षय पाडसवान यांनी मुख्य अभियंता खंदारे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून त्यांच्या कारकिर्दीबाबत गौरवोद्गार काढले.
मुख्य अभियंता म्हणून सव्वादोन वर्षांच्या कार्यकाळात औरंगाबाद परिमंडलातील सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साथीने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व सुरळीत विद्युतपुरवठा देता आल्याचे समाधान आहे, अशी भावना खंदारे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) चंद्रकांत खाडे, प्रणाली विश्लेषक राजाराम पाटील, कार्यकारी अभियंता महेश पाटील, विष्णू ढाकणे, भूषण पहुरकर, सुरेश जाधव, सोमनाथ मठपती, प्रवीण दांडगे, सुरेश दौड यांच्यासह सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, वीज कामगार महासंघ, मागावर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, वीज तांत्रिक कामगार युनियन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, विद्युत मंडळ अधिकारी संघटना, सिनियर इंजिनिअर्स असोसिएशन, इंटक वीज कामगार संघटनेच्या पदाधिकारी-सदस्यांसह महावितरणच्या विविध कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.