आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचा मंत्रिमडळ विस्तार महिन्याभरापासून झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातत्याने दिल्लीवारी होत आहे. शनिवारी वैजापूरची सभा संपल्यानंतर शिंदे तातडीने वैजापूरवरुन औरंगाबादला निघाले. त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी ते दिल्लीला रवाना झाले आहेत. रात्रीच दिल्लीतून ते परत औरंगाबादला येणार आहेत. त्यामुळे औरंगाबादचे कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साडेपाच वाजता वैजापूरला दाखल झाले होते. त्यानंतर वैजापूरच्या सभेला त्यांनी हजेरी लावली. जवळपास पाऊण तास त्यांनी भाषण केले. यावेळी अनपेक्षितपणे माजी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत माजी कृषी मंत्री दादा भुसे माजी मंत्री संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.
मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ मिटेना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोघेच मंत्री राज्याचा कारभार पाहत आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. मात्र, पालकमंत्री नसल्यामुळे नुकसान पाहण्यासाठी कोणी मंत्री जात नाहीत. तसेच मंत्री नसल्यामुळे सर्व कामे खोळंबली असल्यामुळे राज्य सरकारवर टिका करण्यात येत आहे. त्यामुळे यापुर्वी गृहमंत्री अमीत शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्याची बैठक झालेली आहे. दिल्लीत तातडीने मंत्रीमंडळ बैठक तसेच न्यायालयात होणारी सुनावणी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दौऱ्याला चांगला प्रतिसाद
यावेळी माध्यमाशी बोलतांना आमदार उदय सामंत यांनी सांगितले की मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वामध्येच त्यांच्या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता असल्याचे सांगितले. आमदार संजय शिरसाठ म्हणाले की मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांचे नियोजीत सर्व कार्यक्रम वेळेनुसार होणार आहेत. ते दिल्लीत जावून रात्रीच परत येणार आहेत. वैजापूरच्या सभेच्यामध्येच मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास भाषण केले. तेव्हा मला दुसऱ्या कामाला जायचे आहे. त्यामुळे कार्यक्रम लवकर आटपु असे सांगत त्यानंतर वैजापूरवरुन ते दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाने वैजापूर औरंगाबाद प्रवास केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.