आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Chief Minister Eknath Shinde Visit Aurangabad Today | As Soon As The CHIEF Minister's Convoy Was On The Way, Shiv Sainiks Cleaned The Road By Sprinkling Gomutra

राजकीय वैर विकोपाला:मुख्यमंत्री जाताच शिवसैनिकांकडून गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण; 50 खोके - मंत्री ओकेची घोषणाबाजी

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्याला शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या मार्गावरून गेले, त्या मार्गावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले आहे.

शिवाय, 'पन्नास खोके एकदम ओके' अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभेत त्यांची सभेसाठी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आज दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर आले. विमानतळावर आगमन होताच समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तेथून मुख्यमंत्र्यांचा ताफा बिडकीनमार्गे पैठणकडे निघाला. निलजगाव फाटा येथून मुख्यमंत्र्याचा ताफा जाताच शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेर यांच्या नेतृत्वात हातात गोमूत्र भरलेल्या बकेट घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले. 'पन्नास खोके एकदम ओके' घोषणा शिवसैनिकांनी मार्गावर गोमूत्र शिंपडत निषेध नोंदवला.

शिंदे आणि शिवसेनेत वाद

शिवसेना बंडखोरांच्या विरोधात राज्यातील शिवसैनिकांमधून अजूनही असंतोष व्यक्त केला जात आहे. तो ठिकठिकाणी जाणवत आहे. यापूर्वी आरोग्य मंत्री तानाजी सावंत माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे दाखल झाले होते. तेव्हा देखील शिवसैनिकांनी रस्त्याचे शुद्धीकरण केले होते. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे आणि शिवसेनेत वाद पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याच्या घटना देखील घडल्या.

मुख्यमंत्री शिंदेंची पैठणमध्ये सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणमध्ये सभेला संबोधित करताना विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, बाळासाहेबाची खरी शिवसेना कोणती या प्रश्नाचे उत्तर आजच्या सभेतील गर्दीने दिले आहे. कुणी जबरदस्ती पैसे देऊन येथे आले नाही. प्रेमाने सभेसाठी हे लोक येथे आले आहेत, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केला.

पैसे देऊन गर्दी जमवण्याचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा आरोप विरोधकांनी केला. शिंदेच्या सभेपुर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये दोन कार्यकर्तांचा संवाद असून सभेला गर्दी जमवण्यासाठी महिलांना पैसे वाटप करण्याबाबत ते बोलत असल्याचे ऐकायला येत होते. समाजमाध्यमांवर ही क्लिप व्हायरल होताच उद्धव ठाकरे गटाने रोहियो मंत्री संदिपान भुमरेंवर टीकेची झोड उठवली आहे.दरम्यान, ही क्लिप नेमकी कुणाची आहे? हे अद्याप समजू शकले नाही. तसेच, दिव्य मराठीही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

बातम्या आणखी आहेत...