आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदे म्‍हणाले:ईडीला घाबरुन कुणीही शिवसेना किंवा भाजपकडे येऊ नये, राऊतांसोबत खोतकरांनाही लगावला टोला

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने रविवारी कारवाई केली. तेव्हा त्यांनी ‘ईडीला घाबरुन आम्ही शिवसेना सोडणार नाही’ असे टि‌्वट राऊत यांनी केलेे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘त्यांना कुणी इकडे बोलावलेय’ असा टोला लगावला. तसेच ईडीला घाबरुन कुणीही शिवसेना किंवा भाजपकडे येऊ नये,’ असा सल्लाही दिला. नुकतेच शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी ईडीच्या अडचणीमुळेच शिंदे गटाचा ‘पर्याय’ निवडल्याचे अप्रत्यक्ष मान्य केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राऊतांसोबत खोतकरांनाही असा टोला लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...