आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी चे पुर्व मदतदार संघातील आ. अतूल सावे यांनी त्यांच्या घरी शिंदेंसाठी खास मराठवाडी जेवणाचा बेत आखला आहे. रविवारी (31 जुलै) सावे यांच्या निवासस्थानी या खास मेजवानीचे आयोजन केले आहे.
सावेंकडे खास जेवणाचा बेत
भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती असताना त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद शहरात दौऱ्या निमित्त आले आहे. आमदार अतुल सावे यांच्या घरी जेवणाचा हमखास बेत ठरलेला असायचा. मंत्रिमंडळ बैठक असो की प्रशासकीय कामा निमित्त मुख्यमंत्री शहरात असो आमदार सावे यांच्या इकडचे जेवण घेतल्याशिवाय ते जात नसत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून आमदार सावे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना जेवणाची मेजवानी दिली होती.
याअगोदर देखील आखला बेत
सावे कुटूंबीय पार प्रारंभापासूनच अतिथी देवो भव या संस्कृतीला बळ देतात. स्वर्गीय मोरेश्वर सावे खासदार असतानाही अनेक वेळा प्रमोद महाजन किंवा बड्या नेत्यांना त्यांच्याच घरून जेवणाचे डबे जात होते. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जेव्हा ही मराठवाड्याच्या अथवा औरंगाबादच्या दौऱ्यावर आले तर त्यांना हमखास आमदार सावे यांचाच जेवणाचा डबा असतो. स्वर्गीय विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनाही स्थानिक काँग्रेसचे आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या निवासस्थानी मेजवानी कायम ठरलेली असायची.
या पदार्थांची असणार मेजवानी
आमदार सावे कुटुंबीय म्हणजे शुद्ध शाकाहाराचे पालन करणारे कुटुंबीय आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त 31 जुलै रोजी रविवारी आमदार सावे यांच्या निवासस्थानी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भाजप आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना जेवणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शुद्ध शाकाहारी मेजवानी साठी विशेष स्वयंपाकी आमदार सावे यांनी बोलावले असून मराठवाड्यातील अस्सल असलेले जेवण मुख्यमंत्री आणि पाहुण्यांसाठी तयार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पिठलं भाकरी ठेचा विविध गोड पदार्थ तसेच चपाती आणि पंजाबी डीशचा यामध्ये समावेश राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.