आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार मोठ्या योजनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज औरंगाबाद शहरातील चार मोठ्या विकास कामांचे उद्घाटन करतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज औरंगाबाद दौरा आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मराठवाड्यातील विकास कामांचे उद्घाटन केले. राज्यातील सर्वात मोठ्या पाणी पुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला.

गरवारे स्टेडियमवरील भव्य शामियान्यामध्ये हा उद्घाटन कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात केवळ 200 निमंत्रितांना प्रवेश होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबाद येथे 1680 कोटींची शहर पाणी पुरवठा योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, सफारी पार्क, शहरातील 152 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या योजनेअंतर्गत औरंगाबादकरांना 24 तास पाणी उपलब्ध होईल. या योजनेने औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसे पाणी पोहोचेल असे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एवढे दिवस सरकारकडून केवळ लेझीम सुरू होती. दोन पाऊल पुढे चार पाऊल मागे, दोन पाऊल पुढे चार पाऊल मागे. पण आता हे काम पूर्ण होत आहे. पाण्याच्या योजनेविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागच्या सरकारवर टीका केली आहे. तसेच फक्त भूमीपूजन करुन गप्प बसणार नाही तर न सांगताच याची प्रगती पाहायला येईल. फक्त घोषणा करत नाही तर कामांना गती देत आहोत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वांच्या योजनांचे उद्घाटन आज केले. दरम्यान आता भाजप आणि शिवसेनेत या योजनेविषयी श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे. 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजना तत्कालीन भाजप सरकारने मंजूर केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने या योजनेला गती मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser