आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीच्या मुंबईत हालचाली सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (८ जून) औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा घेणार आहेत. एक लाखावर गर्दी जमवण्याचे उद्दिष्ट घेऊन तयारी करत असलेल्या शिवसेेनेने या सभेला ‘स्वाभिमान’ असे नाव दिले आहे. सायंकाळी ठाकरे विमानाने शहरात येतील. आधी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे जातील. त्यानंतर साडेसात वाजता मैदानावर पोहोचतील. तेथुन पुढे २५ ते ३० मिनिटे त्यांचे भाषण होईल. सभेनंतर ते थेट विमानतळाकडे रवाना होतील. या सभेसाठी पोलिसांनी कडेकाेट बंदाेबस्त तैनात केला आहे. १०९ निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह १,३८५ कर्मचारी तैनात असतील. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची बुधवारची सुटी रद्द केली. पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख विनाेद घाेसाळकर या मुंबईकर नेत्यांबरोबरच स्थानिक नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व इतर स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सभेच्या तयारीत व्यग्र आहेत. जिल्ह्यात जवळपास दीड हजार बैठका घेत गर्दी जमवण्याचे नियाेजन करण्यात आले. मराठवाड्यातही बैठका घेण्यात आल्या. बुधवारी दुपारी तीन वाजेपासून मैदानावर गर्दी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी पुन्हा शिवसेनेच्या नेत्यांसमवेत मैदानाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.
}पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, चार सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली २५ निरीक्षक, ८४ सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, १२८८ पुरुष अंमलदार तर ९० महिला अंमलदार बंदोबस्तात असतील. शिवाय, मैदानावर ५ सीसीटीव्ही लावले आहेत, तर ७ पोलिस सभेच्या कॅमेऱ्यासह गस्तीवर. } मैदानाच्या आसपास एकूण १५ पथके स्वतंत्र तैनात असतील. कर्णपुरा, खडकेश्वर, मल्टिपर्पज शाळेजवळ भाषण ऐकण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. तिथेही पोलिस असतील. } याव्यतिरिक्त शहरात ८ संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट लावले आहेत.
व्यासपीठावर येताच भाषण सुरू { दुपारी ३ वाजता मैदानाकडे लोक यायला सुरुवात होईल. {३० हजार खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली. पण मैदानावर २० हजारच खुर्च्या लावल्या. { १०० फूट व्यासपीठांवर मंत्री व नेत्यांची बसण्याची व्यवस्था. साडेसहा वाजता त्यांची भाषणे सुरू होतील. { मुख्यमंत्री साडेसात वाजता मैदानावर पोहोचतील. २५ ते ३० मिनिटे भाषण करतील.
हे मार्ग टाळा : {जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग कमान {भडकल गेट ते खडकेश्वर टी पॉइंट {मिल कॉर्नर ते महात्मा फुले चौक {ज्युबिली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता. {आशा ऑप्टिकल ते सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.