आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेसाठी केवळ एका बैठकीचे आयोजन:साखर कारखान्याच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा; आ. अंबादास दानवेंची खोचक टीका

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात नागरिकांसाठी केवळ एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हा मुख्यमंत्र्यांचा खासगी दौरा असून यात ते केवळ त्यांच्या गटात गेलेल्या व्यक्तीच्या कार्यालयांना भेटी, नगरच्या व्यक्तीच्या साखर कारखाना भूमीपूजन, आणि सत्तारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. असा खोचक टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनी लगावला आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यांचे नियोजन पाहिले तर त्यात जनतेच्या हिताचा कोणताही कार्यक्रम यात दिसत नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे यात सरकारी कामकाज दिसावे यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. असा टोला आमदार अंबादास दानवेंनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी फिरले पाहिजे, दौरे केले पाहिजे. शेतकऱ्यांची परिस्थाती खराब असताना पंचनामे झाले नाही. मागच्या वर्षी उद्धव ठाकरेंनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत केली होती, यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 542 कोटींचा मदत आली होती. ठाकरे सरकारने त्यावेळी निधी दिला होता. असेही दानवेंनी यावेळी सांगितले. मविआवचे सरकार असल्याने मागच्यावर्षी शेतकऱ्यांना मदत केली नव्हती. मात्र यावर्षी भाजपच्या पाठिंब्याचे सरकारअसूनही त्यांनी मदतीचे काही शब्द काढला नाही असे अंबादास दानवेंनी म्हटले आहे.

काहींना मंत्रिमंडळातून डिच्चू
काही जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे लक्षात आले आहे, यातच त्यांना मतदारसंघात होणारा विरोध होतोय. आदित्य ठाकरेंना मिळणारा पाठिंबा पाहून त्याच रुटने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दौरा सुरू केला आहे. यात केवळ एक दोन गावांचा बदल केला आहे. त्या त्या मतदारसंघातील आमदारांना वाटणारी भीती कमी व्हावी यासाठी शिंदेंच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. असा आरोपही अंबादास दानवेंनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...