आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Child Addiction, Child Labour, Child Marriage Serious| Everyone Needs To Work Together Against This | Child Rights Commission President Sushiben Shah Said

बाल व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह गंभीर:सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज-बालक हक्क आयोग अध्यक्ष सुशीबेन शहा

संतोष देशमुख । औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती बाल व्यसनाधीनता, गुन्हेगारी, अत्याचार, बालविवाहाच्या घटना चिंतनीय आहे. याकडे बाल हक्क आयोग, महिला व बालकल्याण, पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था सर्वांनीच एकत्रित येऊन काम करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे बालक हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

जनजागृृती अभियान राबवणे, कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे व अंमली पदार्थ विक्रेत्यांवर वचक बसवणे, अत्याचारीत मुला मुलींचे पुनर्वसन करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग अध्यक्ष सुशिबेन शहा यांनी 25 ते 26 ऑगस्टला औरंगाबाद व 27 ऑगस्ट रोजी बीडचा दौरा केला. बाल हक्क संरक्षणाबाबत आढावा घेतला.

बाल संरक्षणबाबात काय चांगले वाईट आढळून आले व उपाययोजना काय करणार आहेत? याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून जनजागृतीसह वंचित, उपेक्षित आणि अनाथ बालकाना न्याय मिळण्यासाठी आयोग अत्यंत जिव्हाळ्याने तन्मयतेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पिडितांना सन्मानाची वागणूक

एडसग्रस्त मुलगा व त्याच्या वडिलांचे फोटो व व्हिडिओ काढले जात होते. तसेच 4, 7 आणि 11 वर्षांच्या तीन शोषित मुलींची भेट घेऊन संवाद साधला असता त्यांना व त्यांच्या आई, वडील, आजोबांना त्रास दिला गेल्याचे त्यांनी मला सांगितले. असे अजिबात व्हायला नको. याबाबत पोलिस प्रशासनाला सांगितले आहे. पिडितांना व त्यांच्या नातेवाईकांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी, यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार आहोत.

सर्रास औषधी, गोळ्यांची विक्री

क्रांती चौकातील एका मेडिकलमध्ये मी स्वतः गेले व काही औषधी व गोळ्यांची मागणी केली तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, चिठ्ठीशिवाय मला त्याने सर्व औषधी दिली. दुसरे ग्राहक अशाच प्रकारे मागणी करत होते. व मेडिकल मधून पुरवठा केला जात होता. त्याची कुठे नोंद ठेवली जात नव्हती. हा सर्व अतिशय गंभीर प्रकार असून अन्न व औषध प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. विना डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मेडिकलची विक्रीच होता कामा नये.

पोलिसांची मदत घ्यावी

औरंगाबादेत मेडिकल शॉपची संख्या सुमारे पाच हजारांवर आहेत. तर अन्न व औषध प्रशासनाकडे केवळ पाच जणांची टिम असल्याचे मला कळाले आहे. अशा वेळी त्यांनी पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. मनुष्यबळ कमी आहे म्हणून थांबता येणार नसल्याचेही त्यांना स्पष्ट केले.

संस्कार मुल्य रूजवा

व्यसनाधीनता गंभीर समस्या मुलांना अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर विक्री होत असल्याने अंमली पदार्थाचे सेवन वाढले आहे. हि गंभीर समस्या असून बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीवरच घाव घालणे नितांत गरजेचे आहे. दुसरे संस्कार मुल्य रूजवणे आणि हक्काचे शिक्षण त्यांना मिळाले तर यावर आपल्या मात करणे शक्य असल्याचे शहानीं सांगितले.

जनजागृती मोहिम

निधीची तरतूद, बालमित्र अधिकाऱ्यांची नियुक्ती, जिल्हा नियोजन समितीतून बाल कल्याणासाठी तीन टक्के निधीची तरतूद व त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलले आहे. तसेच बालमित्र अधिकाऱ्यांची टिम तयार करून बाल हक्क संरक्षणासाठी जनजागृती मोहिम राबवली जाईल. एनजीओंची मदत घेऊन बालविवाह, बाल मजुरी, गुन्हेगारी कशी कमी करता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही शहा यांनी ग्वाही दिली.

बाल सुधारगृह, अनाथ आश्रमावर करडी नजर

बाल सुधारगृह, अनाथ आश्रम, बालक आश्रमात मुलांचे शोषण, अन्याय, अत्याचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या विरोधात सत्यता पडताळून दोषींवर सक्त अॅक्शन घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. आरटीई अंतर्गत मुलांना त्यांचा हक्क देखील मिळायला हवा, यामध्ये कसूर होत असल्याचेही दिसून येते. याची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...