आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्दैवी घटना:आईची राख सावडण्याच्या दिवशीच मुलाचा मृत्यू, केज तालुक्यातील साळेगावची घटना

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता

आईच्या मृत्यूनंतर राख सावडण्याच्या तिसऱ्याच दिवशी मुलाचा ही कोरोनाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे घडली आहे.

साळेगाव येथील प्रभाकर बब्रुवान गालफाडे ( वय ४०) हे अंबाजोगाई येथील एसबीआय बँकेत खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून रोजंदारीवर काम करीत होते. मागील आठवड्यात बँकेतील काही कर्मचाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे प्रभाकर गालफाडे हा त्या कर्मचाऱ्याचा सहवासीत असल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाली असावी. प्रभाकर गालफाडेस श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे दि. १९ मार्च पासून त्याच्यावर स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले होते. त्याचे दि. २४ मार्च बुधवार रोजी पहाटे निधन झाले.

दरम्यान, प्रभाकर गालफाडे यांची आई कस्तुरबाई बब्रुवाहन गालफाडे यांचा दि. २२ मार्च रोजी सकाळी ८ वा. कोरोना सदृश्य लक्षणाने मृत्यू झाला होता. त्यांचा आज बुधवारी राख सावडण्याचा व दिवसाचा कार्यक्रम होता. त्यातच आई पाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर गालफाडे याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...