आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिशू शिक्षण:शिशू शिक्षणालाही महत्त्व देण्याची गरज

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाचे महत्त्व भविष्यात इतके वाढेल की देशात १००० विद्यापीठे तयार हाेतील, असे मी म्हटले हाेते. ते आज खरे झाले आहे. त्यातील एक महत्त्वाचे विद्यापीठ म्हणून औरंगाबादकडे पाहिले जाते. या देशात अनेक भाषा बाेलल्या जातात. त्यामुळे संगणक तंत्रज्ञान मातृभाषेतून उपलब्ध हाेईल की नाही असे विचारले जात होते. मात्र आता देशात उच्च तंत्रज्ञान शिक्षणही मायबाेलीत देण्याची साेय उपलब्ध झाली आहे. पण उच्च शिक्षणापेक्षाही आपण शिशू शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, असे मत सुपर कॉम्प्युटरचे जनक पद्मभूषण, पद्मश्री, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी शनिवारी दीक्षांत समारंभात व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘भारत आज जगातील आघाडीचे राष्ट्र बनले आहे. अर्थव्यवस्थेतही आपण ५ व्या क्रमांकावर आहोत. आगामी चार ते पाच वर्षात भारत आर्थिक महासत्ता हाेइल. अध्यापन, अध्यापन आणि संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय परिसंस्था निर्माण करण्याच्या अंमलबजावणीत हे विद्यापीठ खूप पुढे आहे, असेही डॉ. भटकर म्हणाले. माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कसे उपयोगी आणता येईल याबाबत शरद पवार माझ्या कार्यालयात येऊन नेहमी विचारत हाेते. आम्ही राजीव गांधींच्या काळातच तसा संकल्प केला होता, आणि तो पूर्ण झाल्याचा आनंद आहे, असे सांगताना डॉ. भटकर यांनी माेदी यांच्याबद्दल ‘विश्वगुरू’ म्हणून गौरवोद‌्गार काढले.

बातम्या आणखी आहेत...