आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरील तिन्ही अनाथ बालके आजीसह १४ जूनला बालकाश्रमात दाखल झाली. त्याच्या १२ दिवसांआधी महाविकास आघाडी सरकारने कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी बालसंगोपन योजना विस्तारण्याची घोषणा केली. २ जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत या “ऐतिहासिक’ निर्णयास मंजुरी देण्यात आली. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना ५ लाखांची मुदत ठेव व एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांना राज्य शासनाच्या बालसंगोपन योजनेद्वारे मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. जिल्हा बालविकास यंत्रणेच्या माध्यमातून कोविड काळात अनाथ झालेल्या १३ हजार बालकांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यासाठी दर महिन्याला २,३७५ रुपये बालसंगोपन मदतीच्या वाढीव दराचा प्रस्ताव वित्त खात्याला पाठविण्यात आला. मात्र, अन्य खात्यांच्या काय योजना आहेत याचा शोध घेण्याचे कारण देऊन तो प्रस्ताव वित्त खात्याकडून माघारी पाठविण्यात आला आहे.
म्हणे, अन्य खात्यांच्या काय योजना आहेत याचा शोध घ्यायचाय
... अन् फाइल : त्यासाठी ६१ कोटी ९९ लाख ४१,३०० रुपयांचा अतिरिक्त खर्च मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, ती फाइल परत आल्याने या निर्णयाची अंमलबजावणी टांगणीला लागली आहे.
प्रस्ताव : त्यानुसार अन्य अनाथ बालकांसाठी ४९ कोटी ३७ लाख व कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी ३५ कोटी ४८ लाख रुपये वार्षित खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
घोषणा : बालसंगोपन योजनेत अनाथ बालकांसाठी दर महिन्याला १,१०० रुपये मदत करण्यात येते. कोविडनंतर ही मदत दरडोई २,३७५ रुपये करण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केली होती.
अभिप्राय की, वित्त विभागाचा वेळकाढूपणा
1. अन्य विभागांमध्ये अनाथ बालकांसाठी कोणत्या योजना आहेत याची माहिती आणा, असा शेराही कोविड अनाथ बालकांच्या मदतीची फाइल माघारी पाठवताना वित्त विभागाकडून मारण्यात आला आहे.
2. त्यानुसार आता प्रत्येक खात्यात या मुलांसाठी काय सुविधा आहे याचा शोध घेण्याचा वेळकाढू प्रकार सुरू आहे. आतापर्यंत फक्त तीन-चार खात्यांकडून माहिती मिळाली आहे, बाकी अनेक खात्यांची बाकी आहे.
3. कोविड अनाथ बालकांच्या या वाढीव मदतीस मंजुरी न देण्यासाठी वित्त विभागाने ही पळवाट शोधल्याचे बोलले जाते.
आमच्या येथील मुलांना आजीची माया मिळाली
आश्रमात मुलं सुखरूप आहेत. अभ्यासातील त्यांचा रस पाहून चांगल्या शाळेतसुद्धा घातले आहे. शाळेने फी माफ केली. मुलांच्या आजीला आधार उरला नव्हता. मुलं त्यांचा जीव की प्राण. त्या रोज भेटीसाठी येत. शेवटी आम्हीच त्यांना आश्रमात राहण्याची परवानगी दिली. आता त्या सर्वच मुलांना नातवांची माया देत आहेत. - दीपक निमोणे, अधीक्षक
लॉकडाऊनमुळे वडिलांनी आत्महत्या केली, कोरोनाने आईला हिरावले, आता तिन्ही मुले आजीसह बालकाश्रमात
औरंगाबादच्या सातारा भागातील म्हाडा वसाहतीत हातावर पोट असलेल्या कुटुंबातील संजय, विजय आणि अजय (बदललेली नावे) ही मुले गेल्या काही महिन्यांपासून बालकाश्रमात आहेत. लॉकडाऊनच्या काळात कर्जबाजारी झालेल्या वडिलांनी २६ डिसेंबर २०२० रोजी आत्महत्या केली आणि ३ मे २०२१ रोजी कोरोनामुळे आईने जगाचा निरोप घेतला. या तीन लेकरांना घेऊन आजीही निराधार झाली. वयस्कर आजी त्यांचा सांभाळ करू शकत नाही, म्हणून शेवटी आजीसह ते चौघे बालकाश्रमात आहेत. आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव राठोड यांनी त्यांना १४ जूनपासून संस्थेत आश्रय दिला आहे. काळाने घाला घातला, मात्र मुलांची उमेद संपलेली नाही. संजयला डॉक्टर बनायचे आहे, विजयला मिलिटरीत जायचे आहे तर अजयला पोलिस व्हायचे आहे. त्यासाठी मुले जीव ओतून अभ्यास करीत आहेत. शासनाने मदत जाहीर केल्याचे ऐकले, पण मिळाले मात्र काहीच नाही, डोळ्यात पाणी आणून आजीने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.