आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणपत्रक गुणवत्तेचे अंतिम मानक नाही:पाल्यांना अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, ‘दिव्य मराठी’ने गठित केलेल्या तज्ज्ञांच्या पॅनलने दिला सल्ला

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुणपत्रक हे गुणवत्तेचे अंतिम मानक नाही. पालकांनी त्यांच्या पाल्यांना अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांच्यातील वेगळे गुण हेरून त्यांना प्रोत्साहन दिले तर ते नक्कीच वेगळी वाट निवडून यशस्वी होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. बारावी निकालाचा विद्यार्थी-पालकांना अन्वयार्थ समजावण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि पारंपरिक अभ्यासक्रमातील तीन तज्ज्ञांचे पॅनल गठित केले होते. या तिन्ही तज्ज्ञांनी विविध कोर्सेसचे उपलब्ध पर्याय सांगितले.

5% पालकांना वाटते पाल्याने निवडावी वेगळी वाट मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हेच करिअर आहे, असा बहुतांश पालक-विद्यार्थ्यांचा समज असतो. पण आपल्या पाल्याने वेगळी वाट निवडावी, असे ५ टक्के पालकांना वाटत असते. त्यामुळे ते बीएसह बीएस्सी, बीकॉमला प्रवेश घेतात. बारावीला ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण जरी मिळाले तरी केवळ यूपीएससी करण्यासाठी ते पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. विषयही त्याच पद्धतीचे निवडतात. सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या संस्थांमार्फत प्री-आयएएस कोचिंग दिले जाते. त्यामुळे पाच-सहा वर्षांत बीएला प्रवेशाचा ट्रेंड वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. भविष्यात असेच चित्र राहिले तर यूपीएससीमध्ये मराठी टक्का नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही, असेही तज्ञांनी या वेळी सांगितले.

नवी दिल्ली येथे आयजीएमपीआय अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस ऑफ इंडिया ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेत विविध प्रकारचे दोनशेपेक्षा अधिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. विशेषत: फूड टेक्नॉलॉजी, फार्मा आणि हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये विविध कोर्सेस आहेत.

यूजी-पीजीचे आयआयएम देशात अनेक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम आहेत. त्यापैकी पाच आयआयएम अत्यंत वेगळे आहेत. आयआयएम-इंदूर, आयआयएम-रोहतक, आयआयएम-बुद्धगया, आयआयएम-रांची आणि आयआयएम जम्मूचा त्यामध्ये समावेश आहे. या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. ‘आयपीमॅट’ नावाची प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागते. पात्र विद्यार्थ्यांना पाचपैकी एका संस्थेत प्रवेश मिळाला तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी (यूजी-पीजी) असे दोन्ही कोर्स एकाच वेळी करता येणे शक्य आहे. हा कोर्स एकूण पाच वर्षांचा आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित आयआयएम संस्थांच्या संकेतस्थळावर जाऊन परिपूर्ण माहिती घ्यावी. पाचही ठिकाणी ७०० ते ८०० प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी करून पात्रता परीक्षा द्यावी.

बातम्या आणखी आहेत...