आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त स्क्रीनचा मुलांना काय धोका होतो?:जास्त व्हिडिओ गेम्स खेळत असणाऱ्या मुलांत ओसीडी धोका, ते चिडखोर होतात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांमध्ये स्क्रीन डिव्हाइसचे व्यसन वाढत आहे.युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफाेर्नियाच्या अहवालानुसार, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांमध्ये ओसीडी म्हणते ऑबेसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचा धोका वाढतो. याची ही माहिती...

{ओसीडी काय आहे? ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मानसिक आरोग्यावर परिणाम करते. पीडिताच्या मेंदूत एखाद्या गोष्टीवरून नकारात्मक विचार आणि भीती रूजते. त्यापासून दूर जाण्यासाठी एक काम वारंवार करतात. पीडित घरात आणि आसपास गरज नसताना वारंवार स्वच्छता करतात. स्वच्छतेविना ते कोणत्याही वस्तूचा वा जागेचा वापर करत नाहीत. {जास्त स्क्रीन टाइमने कसा होतो ओसीडी? जास्त व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलांना वारंवार खेळण्याचे व्यसन जडते. ठरवून सुद्धा ते त्यापासून लांब राहू शकत नाहीत. ही मुले पुढे चालून ओसीडी म्हणून विकसित होतात. यामुळे मुलांना स्क्रीन टाइमचे व्यसन जडते आणि ते चिडखोर होतात. ९,२०४ प्री-टीन्सवरील संशोधनात दिसले की, सर्वसाधारणपणे १ दिवसात ४ तास ऑनलाइन प्लॅटफॉर्म व अॅप्सवर ते घालवतात. {हे कसे टाळता येईल? मुलांना ओसीडीपासून दूर ठेवण्यासाठी स्क्रिन टाइम निश्चित केला पाहिजे. अभ्यासाशिवाय केवळ काही वेळ करमणुकीसाठीच मोबाइल किंवा टीव्ही दाखवा. यादरम्यान ते स्क्रीनवर काय करत आहेत याकडेही लक्ष ठेवा. मुलांचे काम आणि त्यांच्या यशाचे पालकांनी कौतुक करावे.

बातम्या आणखी आहेत...