आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाची न्यायालयाला भावनिक साद:'मला पुन्हा आई - बाबासोबत रहायचेय', घटस्फोटामुळे बाल न्याय मंडळाकडे आहे ताबा

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुधाचे दात अद्याप पूर्णत: आलेले नसताना, कोवळ्या वयात माता पित्यापासून विभक्त होतानाच्या वेदनेने विव्हळणाऱ्या मुलाने जेव्हा आपल्याला आई आणि वडील दोघांसोबत राहायचे आहे असे सांगितले. यामुळे न्यायाधीश सह सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. पती पत्नीच्या वादात बाल न्याय मंडळात मुलाचा ताबा देताना छोट्या मुलाने घातलेली भावनिक साद यामुळे सर्वांचे ह्रदय हेलावून गेले. अहो साहेब कागदावर लिहताना मला आई आणि वडिलांसोबत राहायचे आहे असे लिहा म्हणून सांगताच क्षणभर सर्वजण अवाक् झाले.

औरंगाबाद माहेर असलेली महिला आणि नाशिकला राहणारे पुरूष यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्या कौटुंबिक जीवनात या ना त्या कारणाने सतत वाद होत राहिले. लग्नानंतर सहा महिन्यात त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. वादावादीत त्यांना एक मुलगा झाला. वाटले मुलाच्या जन्माने त्यांच्यातील दुरावा कमी होऊन गुणागोविंदाने दोघे नांदतील. परंतु ही आशा फोल ठरली. मुलाच्या जन्मानंतर वाद कमी होण्याऐवजी वाढतच गेले. वर्षभरापूर्वी मुलगा चार वर्षाचा असताना पती पत्नी विभक्त झाले. मुलाचा ताबा आईकडे देण्यात आला.

मुलगा औरंगाबादला शाळेत जाऊ लागला. वडिलांना मुलाची खूप आठवण येऊ लागली. ते सरळ मुलास भेटायला त्याच्या शाळेत गेले. मुलाने खूप दिवसांनी पप्पा भेटले म्हणून त्यांना मिठी मारली. आता मी तुमच्याकडेच राहणार म्हणून तो कंबरेला मारलेली मिठी सोडेना. ओक्साबोक्सी रडू लागला. वडिलांनी त्यास परस्पर आपल्यासोबत नाशिकला नेले. मुलाचे अपहरण केले म्हणून पत्नीच्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलाला कुणाकडे द्यावे

मुलास कोणाकडे द्यावे यासंबंधीची सुनावणी सुरू झाली. बाल न्याय मंडळाचे सदस्य चर्चा करू लागले. मुलगा आईकडे जायला तयार नव्हता. नंतर त्याला विचारण्यात आले तेव्हा म्हणाला एक दिवस आईकडे आणि एक दिवस वडिलांकडे राहतो म्हणून त्याने सांगितले. मुलाचे बोलणे ऐकूण आई रडायला लागली. आईचे रडणे मुलाच्या मनाला लागले. तेव्हा मुलगा म्हणाला ठिक आहे आईकडे पाच दिवस राहतो. यावरून समितीने यासंबंधी कागदावर आदेश लिहायला सुरूवात केली. मुलगा पुन्हा समितीच्या सदस्यांकडे गेला.

तुम्ही माझ्या ताब्यासंबंधी कागदावर लिहत आहात. तर त्यावर लिहा मला आई आणि वडील दोघेही पाहिजे. मला दोघांसोबत राहायचे आहे असे त्यावर लिहा आणि दोघांना एकत्र राहायला सांगा. एवढ्या लहान वयात मुलाच्या भावना काय आहेत हे पाहून सर्व सदस्य अवाक् झाले. या वादात काय आदेश पारीत करावे हे त्यांना समजेनासे झाले. मुलगा पाच वर्षांचा आहे परंतु खूप हुशार आहे. न्याय मंडळाने तुर्तास मुलास आईकडे दिले

बातम्या आणखी आहेत...