आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपुर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर दाखल झालेला बलात्काराच्या गुन्हा खोटा आहे. मालेगावचा नगरसेवक नदिमोद्दीन शेख उर्फ नदिम पिटर याने माझ्यावर अत्याचार करुन महेबुब शेख यांच्या विरोधात खोटी तक्रार द्यायला लावली. त्यात आष्ठीमध्ये भाजप आमदार सुरेश धस व नेत्या चित्रा वाघ यांचा त्या कटात सहभाग झाला, असे खळबळजनक आरोप 30 वर्षीय पिडितेने केला आहे. तीच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात नदिमोद्दीन व त्या या सगळ्या कटात मदत करणाऱ्या मूुकूंदवाडीतील विशाल खिल्लारे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डिसेंबर, 2020 मध्ये महेबुब शेख यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. त्यातील पिडितेची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, एकुन तपासात वारंवार अनेक त्रुटी समोर आल्या. न्यायालयाने याप्रकरणी तपास पथकावर देखील अयोग्य तपासाचा ठपका ठेवला. शनिवारी मात्र या प्रकरणाला अचानक नवे वळण मिळाले.
महेबुब शेख यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या तक्रारीतील पिडितेने जिन्सी पोलिसांकडे तक्रार केली. त्यात मालेगावचा नगरसेवक नदिमोद्दीन ने हा सर्व प्रकार करण्यासाठी धमकावल्याचे म्हटले आहे. शिवाय, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्या अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महेबुब यांच्या विरोधात खोटी तक्रार देण्यासाठी दबाव टाकला. नाशिक पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, सिडको पोलिस ठाण्यात तयारी करवून तक्रार देण्यास लावले. त्यानंतर आष्ठीमध्ये नेऊन धस व वाघ यांनी माध्यमांसमोर बोलण्याचे ट्रेनिंग दिले. वाघ यांनी मला तुला आता एफआयर मध्ये जे लिहिलंय, तेच कायम सांगायचे आहे, अन्यथा जेलमध्ये सडशील, असे धमकावले. धस यांनी माध्यमांना देण्याची प्रतिक्रिया लिहून दिली. जाताना मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही, असे वाघ यांनी सांगितले, असे देखील पिडितेने तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे मेहबुब शेख यांच्यावरील बलात्काराच्या गुन्ह्याला वेगळे वळण मिळाले आहे. शिवाय, पुण्यातील एका पिडितेने देेखील वाघ यांच्यार अशाच प्रकारे आरोप केले होते. औंरगाबादेत देखील एका पिडितेने त्यांच्यावर तसेच आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.