आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान झालेल्या घरवापसीची खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यासाठी मंगळवारी राज्यात २० ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या प्रकाराने हिंदू व ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने औरंगाबाद, पुणे, मुंबईसह दिल्लीत तक्रारी दाखल केल्या. .
२५ डिसेंबर रोजी जगभरात नाताळाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना पैठणच्या नाथ मंदिरात १२ ख्रिस्ती कुटुंबातील ५३ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्याच्या बातम्या झळकल्या. हे सर्व लोक जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवगाव खवने गावातले होते.
मात्र, दुसऱ्याच दिवशी मंदिरातील पुजाऱ्यांनी धर्मांतर झाल्याचे नाकारले. या प्रकाराने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी संबंधितांना जाहीर माफी मागण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, माफी न आल्याने महासंघाने दिल्लीसह २० ठिकाणी तक्रारी दाखल केल्या.
तक्रारीत पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी, संजय वालतुरे व या कार्यक्रमाशी संबंधित इतरांच्या नावांचा समावेश आहे. भादंविच्या कलम २९५- अ आणि ३४ नुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदूंनाच ख्रिश्चन म्हणायचे व पुन्हा त्यांनाच हिंदू बनवायचे हे षड्यंत्र असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवावा व भारतीयांची राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवावी, असे शिंदे म्हणाले.
राज्यभरात महासंघाने केल्या तक्रारी
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल शिंदे आणि राज्य उपाध्यक्ष संजीव कांबळे- ठाणे, डॉ.वंदना बेंजामिन, नागपूर, आनंद म्हाळुंगेकर, कोल्हापूर, नितीन गोर्डे, पुणे, नितीन गायकवाड, रेव्ह. वर्षा सिंग, दिल्ली, विल्यम चंदनशीव, पुणे, शेळके, जयंत रायबोर्डे, बुलडाणा, राजेश थोरात-अहमदनगर, सावन वाघमारे, अँड.डँनिएल ताकवाले,औरंगाबाद, उल्हास भोसले-परभणी, रेव्ह.डॅनिअल तारू, स्वरूप घाटगे, अकोला, राजू दांडगे, वर्धा, शिमोन नागोरे, नांदेड, विवेक निर्मळ, जालना, रिकी कांबळे, रितेश गोर्डे, पुणे, अँथनी वाकडे, सुनीत ढगे, अहमदनगर, अॅड. प्रकाश बेंजामिन, नागपुर, मॅथ्यू जोसेफ, बीड, मुकेश घाटगे, जालना, जयंत रायबोर्डे, बुलडाणा आणि राज एडके यांनी मुंबईत तक्रारी दाखल केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.