आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविक्री केल्यानंतर सहा वर्षांत विकसित न केलेल्या भूखंडांच्या अतिरिक्त भाड्यापोटी सिडकोने २०१८ ते २०२१ या तीन वर्षांत छत्रपती संभाजीनगर आणि वाळूज प्रकल्पातून १३ कोटी १७ लाख १३ हजार ६९७ रुपये वसूल केले आहेत. सिडकोचे महापालिकेकडे हस्तांतरण होऊनही अशा प्रकारे वसुली केली जात अाहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. कोविडकाळात अतिरिक्त भाडेपट्टा सवलत देताना सिडको प्रशासनाने चलाखी केली आहे. केवळ मार्च २०२२ मध्ये कराराची मुदत संपत असलेल्या मालमत्तांच्या बाबतीत नऊ महिन्यांची सवलत दिली आहे.
सिडकोकडून मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिचा सहा वर्षांत विकास करणे आणि भोगवटा प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सादर करणे अनिवार्य आहे. असे केले नाही तर सिडको करारानंतरच्या पहिल्या वर्षी खरेदीच्या मूळ किमतीवर ५ टक्के, दुसऱ्या वर्षी १० टक्के असा टप्प्याटप्प्याने ४० टक्के दंड आकारण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर प्रकल्पात २०१६ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत निवासी भूखंड १७३, निवासी तथा व्यापारी भूखंड ८, सामाजिक सुविधा भूखंड ६ आणि छोटे वाणिज्य भूखंड ५० अशा एकूण २३७ मालमत्तांची विक्री केली.
या संपूर्ण मालमत्तांचा सहा वर्षांत विकास करणे गरजेचे होते. अशा मालमत्तांचा करार मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर या मालमत्तांना अतिरिक्त भाडेपट्टा लागू झाला. २०१८ ते २०२१ या तीन आर्थिक वर्षांत सिडकोने नवीन शहरामध्ये अतिरिक्त भाडेपट्टा रकमेपोटी छत्रपती संभाजीनगर आणि वाळूज प्रकल्पातून रक्कम वसूल केली.
भाडेपट्ट्यात कोविडमुळे सवलतीची केली होती मागणी मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या काळात कोरोनामुळे विविध संस्था-संघटनांकडून अतिरिक्त भाडेपट्ट्यात सवलतीची मागणी करण्यात आली. सिडकोने २०१६ मध्ये विक्री झालेल्या मालमत्तांना नऊ महिन्यांची सवलत दिली. यापूर्वीच्या मालमत्तांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नसेल आणि विहित मुदतीपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर त्यातून नऊ महिने वजा केले. त्यावर होणाऱ्या कालावधीवर अतिरिक्त भाडेपट्टा वसूल केला.
सिडकोचा जिझिया कर सिडकोवर कुठलेच नियंत्रण राहिले नाही. लोकप्रतिनिधींकडून विचारणा होत नाही. सिडकोचा छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील उद्देश पूर्ण झालेला आहे. सिडको जिझिया कर लावून नागरिकांना वेठीस धरत आहे. सिडकोने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व्यवस्था अशा करांमधून केलेली आहे. - विश्वनाथ स्वामी, शिवसेना पूर्व विधानसभा प्रमुख (उद्धव ठाकरे गट)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.