आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहानलेले औरंगाबादकर रस्त्यावर:सिडकोत जलआक्रोश; भाजप-मनसेचे आक्रमक आंदोलन, शिवसेना नेत्यांनी पोलिस ठाण्यात बसून घेतली मनपा अधिकाऱ्यांची हजेरी

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महिनाभरापूर्वी (५ एप्रिल) पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. ते आश्वासन पाण्यात बुडाले, असा आरोप करत शुक्रवारी (६ मे) भाजप - मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एन-७ जलकुंभावर मुक्कामी आंदोलन सुरू केले. तत्पूर्वी पवननगरात (हडको) सात दिवसांपासून पाणी न आल्याने ललित सरदेशपांडे या शिवसैनिकाने सकाळी साडेदहाच्या सुमारास अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा इशारा दिला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. एकीकडे हा प्रकार सुरू असताना पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जायस्वाल यांनी बैठक घेऊन नव्या पाणीपुरवठा योजनेची प्रगती दोन महिन्यांत दिसलीच पाहिजे, असा इशारा दिला.

४ एप्रिलला भाजपने आंदोलन केल्यावर दोन लाख लोकांचे पाणी चोरणारे १५ दिवसांत शोधू, असे आश्वासन मनपा प्रशासकांनी दिले. खंडपीठाच्या न्यायमूर्तींनीही त्यांच्या घरी सात दिवसांनी पाणी येत असल्याचे म्हटले. मग प्रशासकांनी धावपळ करत समान पाणीपुरवठ्यासाठी अभियंत्यांना सात दिवसाची मुदत दिली.

त्यानेही फरक पडला नाही. त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक नितीन चित्ते, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, महेश माळवदकर, माधुरी अदवंत आदींनी एन-७च्या जलकुंभावर सर्वपक्षीय मुक्कामी आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यात फक्त मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...