आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:विमानतळावर महिला डॉक्टरकडून सीआयएसएफ उपनिरीक्षकास मारहाण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गुन्हा सायंकाळी घडल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवली अटक

पंजाब येथून आलेल्या डॉ. जिज्ञासा तिवारी (३९) हिने चिकलठाणा विमानतळावर सीआयएसएफच्या महिला उपनिरीक्षकालाच मारहाण केली. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली. गुरुवारी सकाळी तिला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली.

३२ वर्षीय महिला उपनिरीक्षक चार वर्षांपासून विमानतळावर कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी एक ते रात्री अकरा या वेळेत त्यांची नेमणूक होती. त्या महिला प्रवाशांची फ्रिसकिंग बूथमध्ये नेऊन तपासणी करतात. भटिंडावरून आलेल्या डॉ. जिज्ञासा तिवारी यांना तपासणीसाठी अडवण्यात आले. फ्रिसकिंग बूथमध्ये त्यांना बोर्डिंग पास मागून तपासण्यास सुरुवात केली तेव्हा जिज्ञासा संतापल्या व आरडाओरड करू लागल्या. काही वेळातच त्यांनी उपनिरीक्षक महिलेला दोन चापटा मारल्या. त्यांचे वागणे नियंत्रणाबाहेर जात असल्याने उपनिरीक्षकाने वरिष्ठांना बोलावले. अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्याचे ठरवले. त्यानुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जिज्ञासावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

म्हणे.. तणावात होते म्हणून मारहाणीचे कृत्य घडले
सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही, त्यामुळे जिज्ञासा यांना बुधवारी नोटीस देऊन सोडले. गुरुवारी सकाळी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.दरम्यान, मी तणावाखाली होते. त्यातून हा प्रकार घडल्याची कबुली नंतर जिज्ञासा हिने पोलिसांकडे दिली.

बातम्या आणखी आहेत...