आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष:पाणी, रस्ते, ड्रेनेज, पथदिवेही नसल्याने राजनगर, मुकुंदनगरचे नागरिक त्रस्त

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदवाडीच्या परिसरातील राजनगर, मुकुंदनगर, राजमातानगरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. मनपाने या नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नसल्याने त्यांना पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात माेठा त्रास सहन करत मरणयातना सोसाव्या लागत आहे. त्यामुळे मनपाने पाणी, रस्ते, ड्रेनेज, विजेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून हाेत आहे.

राजनगर, मुकुंदनगर, राजमातानगर, जिजाऊनगर १५ वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आहे. या परिसरात २० हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. परंतु, या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुख्य आणि अंतर्गत रस्ते नाहीत, ड्रेनेजलाइनची सुविधाही नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वखर्चाने ड्रेनेजलाइन टाकली हाेती. मात्र, तीही चोकअप होते. मनपाने पथदिवेही लावले नाहीत. स्थानिक नगरसेवकांनी वारंवार निवेदने दिली. त्यामुळे मनपाने दहा टक्के परिसरात काम केल्याचे रहिवशांनी म्हटले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

काही निधी मंजूर, लवकरच काम करू
गेल्या पंचवार्षिकमध्ये या परिसराचा मनपात समावेश करण्यात आला. मागील कार्यकाळात मनपा आणि आमदार हरिभाऊ बागडे यांच्या निधीतून कामे झाली आहेत. सध्या मुख्य रस्त्याचा प्रस्ताव पाठवला आहे. विकासकामांसाठी काही निधी मंजूर झाला आहे. त्यातूनही काही कामे केली जातील.
-राजू संधा, वॉर्ड अभियंता, मनपा

मनपा हद्दीत असूनही सुविधा नाही
आम्ही महानगरपालिका हद्दीत राहतो. परंतु, आम्हाला मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत. आम्हला पावसाळ्यात चालणे कठीण होते. तसेच, इतर दिवसांतही रस्त्यावर खड्डे पडलेले असतात. याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे.
-विनोद मोहिते

बातम्या आणखी आहेत...