आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदली रद्द करण्याची मागणी:हिंगोली पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या विरोधात नागरिक एकवटले, आंदोलनाची तयारी सुरू

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची अचानक झालेली बदली रद्द करावी या मागणीसाठी नागरिकांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून सोशल मीडिया वरून नाही बदलीबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. सदली बदली रद्द करण्यासाठी सामाजिक अंतरा पाळत मंगळवारी ता. 7 प्रशासनाकडे निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले आहे.

हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी मागील साडे तीन वर्षांमध्ये शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला. शहरांमध्ये नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच करवसुली वरही चांगलाच भर दिला. यासोबतच सर्व प्रभागांमध्ये विकास कामे करण्यावरही त्यांनी भर दिला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवक सोबत चर्चा करून शहराचा कायापालट केला जात आहे. शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेत अरुंद झालेली रस्ते रुंद केले आहेत. त्यांच्या धडाडीच्या कामामुळे राज्यस्तरावर स्वच्छता अभियानाचा पुरस्कारही मिळाला आहे. तसेच हिंगोली शहरात प्लास्टिक मुक्तीची मोहीमही राबवली.

दरम्यान सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये आरोग्य व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा लावून पालिकेने काम केले आहे. मुख्याधिकारी पाटील यांनी शहरात २४ तास काम करून कोरोना बाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. याशिवाय अनेकांना सूचना न पाळल्यामुळे  दंड देखील लावला आहे. शहरात काही दिवसापासुनच तीस ते चाळीस वर्षापासून असलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करून त्या ठिकाणी रस्ते काम केले जात आहे. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलू लागला आहे

श्री पाटील यांच्या बदलीचे आदेश धडकल्याने हिंगोली शहरवासी यातून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सोशल मीडिया वरून या संदर्भामध्ये अनेकांनी नाराजी व्यक्त करून बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची तयारी देखील चालवली आहे. पत्रकार संघटने सोबतच इतर सामाजिक संघटनांनीही पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी शासनाकडे निवेदन सादर करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

94 टक्के नागरिकांचा बदलीला विरोध
मुख्याधिकारी पाटील यांच्या बदली संदर्भात सोशल मीडियावर वोटिंग देखील घेण्यात आली . यामध्ये ९४ टक्के नागरिकांनी बदलीला विरोध दर्शवला असून सहा टक्के नागरिकांनी बदली व्हावी असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या बदलीला नागरीकांचा विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser