आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:औरंगाबादचा वारसा जपण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे : मेजर गुप्ता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादला लाभलेल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. हा वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे (इंटॅक) चेअरमन निवृत्त मेजर जनरल एल. के. गुप्ता यांनी व्यक्त केले.

इंटॅक औरंगाबाद चॅप्टरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. वेरूळच्या अल्पपरिचित लेण्यांमधून घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात हा कार्यक्रम झाला. राज्य समन्वयक मुकुंद भोगले, औरंगाबादचे समन्वयक माया वैद्य, एमजीएमचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धकांनी काढलेले लेण्यांचे फोटो दाखवण्यात आले. माया वैद्य म्हणाल्या की, इंटॅक ही संस्था औरंगाबादचा वारसा जपत आहे. कागजीपुरा येथे पेपर मेकिंगला पुनरुज्जीवित करण्याचाही आम्ही प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात एमजीएमचे डॉ. गिरीश गाडेकर, सहसमन्वयक अॅड. स्वप्निल जोशी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शर्वरी कुलकर्णी यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...