आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन वर्षांनंतर मनपा प्रशासन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शनिवारी रस्त्यावर उतरले. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी विविध ठिकाणी नागरी समस्यांची पाहणी केली. लाेकांनी त्यांना नळांना येणारे गढूळ पाणी आणून दाखवले. रमानगर येथील कचरा केंद्राची हटवण्याची मागणी केली. या समस्या तत्काळ साेडवण्याचे आदेश चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
प्रशासक शनिवारी सकाळीच रमानगरात पाेहाेचले. माजी नगरसेवक शिल्पाराणी वाडकर यांच्यासह रहिवाशांनी येथे कचरा डेपो होत असल्याची तक्रार केली. घनकचरा विभाग येथे कचऱ्याच्या गाड्या पार्किंगसाठी अत्याधुनिक टान्सफाॅर्मर स्टेशन उभारत आहे. त्यासाठी जुन्या विहिरी बुजवल्याचा, झाडे ताेडल्याचा आराेप रहिवाशांनी केला. बाजूला वसाहत असल्याने कचरा प्रकल्प उभारू नये, अशी मागणी केली. तेव्हा येथे कचरा डंपिंग व साठवणूक केली जाणार नाही, फक्त अत्याधुनिक ट्रान्सफॉर्मर स्टेशन मनपा उभारणार आहे, असे प्रशासक म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.