आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासडलेले लोखंडी खांब वाकून केव्हाही कोसळावं असं छत… चाळणी झालेले पत्रे.. गायब झालेले दिवे आणि कचराकुंडी बनलेला परिसर… हे चित्र आहे स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या औरंगाबाद शहरातील स्मशानभूमींचे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना मृत्यूनंतरही समस्यांचा सामना करावा लागावा असं विदारक चित्र पाहायला मिळालं. सातारा, बेगमपुरा आणि पुष्पनगरी या स्मशानभूमींची ही दुरवस्था असताना, “स्मार्ट’ बनू पाहणाऱ्या औरंगाबाद शहरात त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसणे, असलेला निधी दुसऱ्या कामासाठी वळवणे, ही शोकांतिका सांगणारा हा ग्राउंड रिपोर्ट.
सातारा स्मशानभूमी डीपीडीसीचा निधी वापरला, परंतु काम नाही परिसरातील ही स्मशानभूमी ग्रामपंचायतीच्या काळात तयार करण्यात आली होती. मनपा व डीपीडीसीने निधी वापरला आहे. परंतु कोणत्या ठिकाणी वापरला हे मात्र दिसून येत नाही. - लक्ष्मण शिंदे, रहिवासी, सातारा
पुष्पनगरी स्मशानभूमी { २००७ नंतर येथे दुरुस्तीच झाली नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. येथील दाहिन्याही तुटल्या आहेत. खांब जीर्ण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शेड तुटलेले आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. { विशेष म्हणजे या स्मशानभूमीसाठी वर्ष २०१८ मध्ये जवळपास पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. तो निधी काेविडसाठी वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठीही मनपाने प्रयत्न केले नाहीत.
बेगमपुरा स्मशानभूमी स्मशानभूमीची कचराकुंडी केली इथे अतिक्रमण वाढते आहे. महापालिकेने इथेसुद्धा कचरा संकलन केंद्र केले आहे. त्यामुळे सुविधा तर सोडा, स्मशानभूमीची यांनी कचराकुंडी केली आहे. - सुरेश पवार, बेगमपुरा रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.