आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:ग्रामीणच्या लसीवर शहरवासीयांचा कब्जा, ग्रामीण भागात लस ऑफलाइन द्या- जिल्हा परिषद अध्यक्षा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनावर विषाणूवर प्रभावी औषध म्हणून कोरोना लसीकडे सध्या पाहिले जात आहे. ही लस मिळवण्यासाठी शहरातील नागरिक विविध शकला लढू लस घेण्याचा प्रयत्न करत आहे. यात शहरातील नागरिक फुलंब्री, कन्नड, खुलताबाद या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लस घेत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केले आहेत. यामुळे ग्रामीण भागात नोंदणी न करता ऑफलाइन पद्धतीने ग्रामस्थांना लस देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

एकीकडे जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या तसेच आरोग्य सेवा कमी पडत असल्याने नागरीकांचा लसीकडे ओढा वाढला आहे. यात शहरातील नागरिक शिक्षित असल्याने ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याचे प्रकार गेल्या आठवड्यात भरापासून सुरू आहे. दरम्यान सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी खुलताबाद, कन्नड, वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य सेवा तसेच लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामस्थांना ऑनलाइन नोंदणी जमत नाही, मोबाईलला रेज नाही तसेच बऱ्याच दुर्गम भागातील गावात एकही लस मिळालेले नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अशिक्षित वर्ग आहे, तसेच मोबाईलला रेंज नसल्यामुळे ऑनलाईन नोंदणीला अनेक अडचणी येत आहेत. याचा फायदा शहरातील नागरिक घेत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांची नोंदणी करुन ऑफलाइन पद्धतीने लस द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. - मीना शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा.

बातम्या आणखी आहेत...