आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी मोदी सरकारविरोधात शहरभर बॅनर लावले. ईडी तो बहाना है भाजप सरकार को अपने घोटाले और नाकामी छुपाना है. या आशयाचे १९ जून रोजी शहरभर बॅनर लावत भाजप सरकारचा निषेध केला.
राहुल गांधींच्या विरोधात नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ शहरात १७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. बॅनरवर केंद्र सरकारच्या ११ निर्णयांवर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत त्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने राजकीय सूडबुद्धीने ईडीची कारवाई केली आहे. त्याच्या निषेधार्थ बॅनर लावले. बॅनरवर बेरोजगारी, देशातील घसरती अर्थव्यवस्था, वाढती महागाई, कोरोना महामारी हाताळताना केंद्र सरकारला आलेले वैफल्य, राफेल घोटाळा, नोटबंदी, जीएसटी टॅक्स, पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ, विफल राष्ट्रीय सुरक्षा नीतीमुळे शेजारी राष्ट्राचे अतिक्रमण, सर्वधर्म समभाव बिघडवणारे सीएए, एनआरसीसारखे कायदे, शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे आदी विषयांवर राहुल गांधी यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून ईडीची कारवाई केली. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध अशा आशयाचे बॅनर शहरभर लावण्यात आले.
सिडकोसह इतर भागांत बॅनर
शहरातील जालना रोड, सिडको, हडको, गारखेडा परिसरात सुमारे २५० बॅनर लावले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारे भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे पितळ उघडे पाडण्यासाठी शहरभर बॅनर लावल्याचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.