आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔद्योगिक परिसरातील एम-१५२ सेक्टरमध्ये असणाऱ्या गणेश प्रेस अँड कोट कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या सहकाऱ्याचा दोन कंत्राटी कामगारांशी वाद झाला. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एचआर विभागाच्या अधिकाऱ्यास धारदार चाकूने वार करत जखमी केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कंपनीत सुपरवायझर तन्वीर दुर्राणी यांचे १३ डिसेंबर रोजी कामावरून कंत्राटी कामगार वृषभ शेळके व राहुल यादव यांच्याशी वाद झाला. तन्वीर यांनी फोन करून ही माहिती एचआर विभागाचे गणेश बटुळे यांना दिली. बटुळे यांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनी बटुळे यांनाच शिवीगाळ केली. सुरक्षा रक्षकाने दोघांनाही कंपनीबाहेर सोडले.
कामगारांनाही मारहाण, उपचार सुरू : कामगार वृषभ शेळके याच्या फिर्यादीवरून १५ डिसेंबर रोजी एचआर विभागाचे गणेश बटुळे यांच्यासह तन्वीर दुराणी, सुरक्षा रक्षक तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गणेश यांनी वृषभ व त्याच्या कामगार मित्राला कंपनीच्या गेटवर लोखंडी दांड्याने मारहाण केली. भावाला फोन करून बोलावले असता त्यालाही मारहाण केल्याने तिघे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.