आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुक्त गावात वाजली शाळेची घंटा:इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू; मास्क, थर्मल गनद्वारे स्क्रीनिंग आणि सॅनिटायझर लावून शाळेत परतले विद्यार्थी

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • पालकांनी शाळेत येणासाठी परवानगी दिली आहे.

राज्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु, पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने कोरोना मुक्त गावातील शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून कोरोनामुक्त असलेल्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले. यात कोरोनामुक्त असलेल्या औरंगाबाद जिल्हयातील 595 गावातील 852 शाळा सुरु झाल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्षपणे शाळा भरलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसा होवू नये. यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. परंतु शाळा बंद असल्याने होणारे परिणाम पाहता. वाढते बालविवाह, बालमजुरी, मानसिक ताणतणाव आणि शाळेबद्दल गोडी न राहणे या तक्रारी येत आहे. यामुळे जी गावे कोरोनामुक्त आहेत. अथवा जिथे मागील तीस दिवसात एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. अशा गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता.

त्यानुसार कोविड 19 चे सर्व नियम पाळत आज विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करून आणि सॅनिटायझर लावून प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी संख्या पहिल्या दिवशी कमी असली तरी पालकांनी शाळेत येणासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, मुलांमध्ये उत्साह असल्याचे शिक्षकांनी सांगितले. तर शाळेतील शिक्षण लवकर समजत असल्याचे विद्यार्थांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...