आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सिद्धार्थ उद्यानातील पार्किंगची सफाई करा ; पाहणीनंतर प्रशासक डॉ. चौधरींनी केल्या सूचना

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सिद्धार्थ उद्यान येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेली दुकानांची स्थळ पाहणी केली. उद्यानातील पार्किंगची साफसफाई व डागडुजी करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. येथील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

येथील कुंड्यांसह दुभाजकात तसेच शहरातील मुख्य रस्त्यांच्या दर्शनी भागात सुशोभित झाडे लावण्याचे आदेश त्यांनी उद्यान विभागाला दिले. विभागाने यासाठी मागवलेल्या कुंड्यांची त्यांनी पाहणी केली. या वेळी अभियंता ए.बी. देशमुख, उपआयुक्त अपर्णा थेटे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, उपअभियंता रामदासी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...