आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचखोराला पकडले:हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयातील लिपीकास 11 हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिपीक विनायक देशपांडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी पकडले

येथील शासकिय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे वैद्यकिय देयक तयार करून सदर देयक कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतांना रुग्णालयातील लिपीक विनायक देशपांडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी एक वाजता रुग्णालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, शासकिय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे एकूण १ लाख ४२६६० रुपयांचे दोन वैद्यकिय देयक मंजूर झाले होते. सदर देयक तयार करून कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी कार्यालयातील लिपीक विनायक देशपांडे याने ११ हजार रुपयांची लाच मागितली. सदर रक्कम आज शासकिय रुग्णालयात आणून देण्याचे ठरले होते.

दरम्यान, या प्रकरणात संबंधीत रुग्णसेवकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पडताळणी झाल्यानंतर आज लाचलुचपतचे प्रभारी उपाधिक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुने, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, रुद्रा कबाडे, संतोष दुमाने, अवी किर्तनकार, ज्ञानेश्‍वर पंचेलिंगे, प्रमोद थोरात, सरनाईक यांच्या पथकाने आज दुपारी एक वाजता रुग्णालय परिसरात सापळा रचला होता.

दरम्यान, आज दुपारी तक्रारदार शासकिय रुग्णालयात गेल्यानंतर गेल्यानंतर लिपीक विनायक देशपांडे याने ११ हजाराची लाच घेताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser