आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळसूबाई शिखर:कळसूबाई शिखरावर औरंगाबादच्या हायकर्स ग्रुपच्या सदस्यांची चढाई

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखरावर औरंगाबाद हायकर्स ग्रुपच्या गिर्यारोहकांनी नुकतीच यशस्वी चढाई केली.या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६६४ मीटर एवढी आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले शिखरावर ग्रुपच्या सदस्यांनी भल्या पहाटे अंधारात बॅटरीच्या प्रकाश झोतात चढण्यास सुरुवात केली. निसर्गरम्य बारी गावापासून चढाई मोहिमेला प्रारंभ केला.

औरंगाबाद हायकर्स ग्रुपचे प्रमुख रतन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नेतृत्व साहिलसिंग राजपूत यांनी केले. ज्योतीसिंग राजपूत, डॉ. बेबी सिंग, मंगल राऊत, दादासाहेब पानमंद, दिलीप भंगाळे, जयश्री भगाळे, संजना भंगाळे, प्रमोद शेळके, विजय औटी, राजेंद्र नारळे, प्रतिभा नारळे, अनुष्का नारळे, अनिकेत नारळे, अविनाश आडसकर, प्रवीण बोडखे, साधना बोडखे, सोहम बोडखे, सई बोडखे, किरण वनगुजर, सुवर्णा वनगुजर, जयश्री कोळपकर, तनिष्का कोळपकर सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...