आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:कचनेरात मोफत उपचारासाठी दवाखाना ; यात्रेत सौभाग्यसागर महाराजांनी केली सुरुवात

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताच्या यात्रा महोत्सवात मंगळवारी सौभाग्यसागर कायमस्वरूपी औषधालयाचे उद‌्घाटन करण्यात आले. डॉ. नीलेश गंगवाल या दवाखान्याचे काम पाहतील.यामध्ये पंचक्रोशीतील विविध जाती-धर्माच्या नागरिकांना मोफत तपासणी, उपचार, औषधी दिली जाणार आहे. यात्रेत मंगळवारी २५ हजार भाविकांनी हजेरी लावली होती. या वेळी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव, आचार्य सौभाग्यसागर गुरुदेव, आचार्य मयंकसागर गुरुदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी ६ वाजेपासूूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. कचनेर गाव जैन धर्मीयांची दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते. महाप्रसाद वाया जाऊ नये म्हणून राजाबाजार व हडको महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी डी.यू.जैन, सुरेश कासलीवाल यांनी सहकार्य केले. प्रवीण लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...