आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी हलक्या पावसाची शक्यता:दिवसभर ढगांचे आच्छादन, हलका पाऊसही पडला

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी होत होती. त्यामुळे सूर्यदर्शन उशिराने झाले. दुपारच्या सत्रात हलका पाऊस पडला. आर्द्रता ८७ टक्क्यांपर्यंत राहिली. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंशांनी वाढ झाल्याने कडाक्याची थंडी गायब झाली. मंगळवारी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने वातावरण ढवळून निघाले आहे. शुक्रवार व शनिवारच्या तुलनेत रविवारी एकाच दिवसात सात अंशांनी रात्रीच्या तापमानात वाढ होऊन ते १४.६ अंश सेल्सियसवर गेले होते. सोमवारी त्यात पुन्हा ३.२ अंशांनी वाढ होऊन ते १७.८ अंश उच्चांकी पातळीवर गेले.

ढगाच्या आच्छादनात पृथ्वीवरून परावृत्त होणारी उष्णता अडकून राहत आहे. परिणामी रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंशांनी मोठी वाढ झाली. बोचऱ्या थंडीचा जोर ओसरला असून सौम्य थंडी जाणवते. दुपारच्या सत्रात दमट वातावरण राहत आहे. परिणामी सर्दी, खोकला, ताप, दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढला आहे. भाजीपाला, फळपिकांवरही दुष्परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...