आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:पुढील आठ दिवस ढगाळ वातावरण; शहरात हलक्या पावसाची शक्यता

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. परिणामी १ व २ डिसेंबर रोजी १०.८ अंशांवर असलेले किमान तापमान शनिवारी १३.६, तर रविवारी ते १६.८ अंशांवर उच्चांक पातळीवर जाऊन पोहोचले. सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी वाढ झाल्याने कडाक्याच्या थंडीत खंड निर्माण झाला आहे. पुढे आठ दिवस बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पावसासाठी ढगांची गर्दी, बाष्प, आर्द्रता, तापमान राहील तेथेच अल्प ते अत्यल्प पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र यांनी दिव्य मराठीशी बोलताना वर्तवली आहे.

रविवारी दिवसभर अधूनमधून आकाशात ढग जमा होत होते. तापमान व आर्द्रतेतही मोठी वाढ झाली आहे. १००८ ते १०१० हेक्टा पास्कल कमी हवेचा दाब राहील. कमाल व किमान तापमानात वाढ होईल. या आठवड्यात कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरून सौम्य थंडी राहील. तसेच बहुतांश जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्यात ५ डिसेंबरला अल्प ते अत्यल्प पावसाची शक्यता निर्माण होईल.

६ व ७ डिसेंबर रोजी चक्रीवादळ, धोका नाही अंदमान निकोबरमधून चक्राकार वारे वाहत आहेत. ते ५ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात दाखल होतील. तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. ६ व ७ डिसेंबर रोजी त्याचे रूपांतर लहानशा चक्रीवादळात होईल. पुढे ८ डिसेंबर रोजी ते तामिळनाडू किनारपट्टीवर सरकेल. त्याचा धोका नाही.

बातम्या आणखी आहेत...