आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिले विविध कर असताना महापालिका प्रशासनाने आस्थापना कर लादला. यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. या विरोधात त्यांनी लढा उभारला आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आस्थापना कर रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे व्यापारी उत्साहीत आहे.
व्यापारी शिष्टमंडळाने पालकमंत्री भुमरे यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. पाणीपट्टी, मालमत्ता कर असताना आस्थापना कर लादला गेला आहे. हा अन्याय आहे. या ज्वलंत मुद्यावरती व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पालकमंत्र्यांनी
अतिशय शांतपणे व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. तसेच यावर सकारात्मक पणे विचार करू. अयोग्यपद्धतीने कर लादला गेला असेल तर तो रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट यांनी देखील आस्थापना करास त्वरित स्थगिती मिळवून देण्यासाठी विशेष व्यापा-यांची सक्षमपणे बाजू मांडली व पालकमंत्र्यांना मागणीचे निवेदन दिले.
यावेळी मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी देखील उपस्थित होते. तर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया ,आदेश पाल सिंग छाबडा, भरत सिंह राजपूत, शिवशंकर स्वामी, लक्ष्मीनारायण राठी, जयंत देवळाणकर, कमल वर्मा, विकास सावजी, कृष्णा वर्मा आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी केली तीव्र नाराजी व्यक्त
बाजारपेठेत अरुंद रस्ते, पार्किंगची भीषण समस्या व अस्वच्छता, आधी समस्याबाबत व्यापारी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. महापालिकेतून सेवा सुविधा मिळाण्याऐवजी कर लादून वसुलीसाठी तगादा लावला जातो. अन्यायकारक कर वगळून इतर करांचा व्यापारी नियमितपणे भरतात. आस्थापना कर लादून व्यापाऱ्यांना संकट टाकण्याचे काम महापालिका करत आहे. त्यामुळे केवळ कर लादण्याऐवजी व्यापाऱ्यांना दर्जेदार मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही कांकरिया यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.