आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा तिसरा टिझर:आम्ही हिंदू, पण हिंदुत्व टोपीत नव्हे डोक्यात; औरंगाबादचे नाव संभाजीनगरच असल्याची गर्जना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या 8 जूनच्या सभेचा तिसरा टिझर रिलीज करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्ही हिंदू आहोत, पण हिंदुत्व टोपीत नव्हे डोक्यात असल्याचे म्हणताना दिसून येत आहे. तर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असल्याचे म्हणत आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे.

टिझरमध्ये नेमके काय?

टिझरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका सभेत बोलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. हे आहेच ना संभाजीनगर. हिंदू आहोत आम्ही आणि हिंदुत्व टोपीत नसते, डोक्यात असते. तर टीझरच्या शेवटी देव, देश आणि धर्म अशी लाइन देण्यात आली आहे. ज्या मधून सर्वांत आधी देव मग देश आणि धर्म असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री काय बोलणार?

शिवसेनेच्या 8 जून रोजी होणाऱ्या सभेला महत्व प्राप्त झाले आहे. कारण महाराष्ट नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी याच जागेवर सभा घेत हिंदुत्व आणि संभाजीनगरचा मुद्दा उचलून धरला होता. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जल आक्रोश मोर्चात संभाजीनगरचा उल्लेख केला. यानंतर त्यांनी उत्तर भारतीयाच्या अधिवेशनात औरंगाबादच्या नामांतरांचा विषय घेत पुन्हा भाजपची सत्ता येईपर्यंत संभाजीनगर होणार नाही, असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला होता. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शहराचे नामांतर करावे, अशी विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 जून रोजीच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपा प्रचाराचा श्री गणेशा?

आगामी काळात औरंगाबाद महापालिकेसह जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने सर्व पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने मनपासाठीच्या प्रचाराचा नारळ जल आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने फोडला आहे. तर मनसेच्या सभेनंतर महाराष्ट्र सैनिकही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता शिवसेना या सभेतून मनपाच्या निवडणुकांचा प्रचाराचा श्री गणेशा करणार का, मुख्यमंत्री काय बोलणार, त्यांच्या रडारवर नेमके कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर ते औरंगाबादसाठी काय घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...