आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योजकांच्या मसिआ संघटनेला नुकताच स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लीडरशिपच्या वतीने २०२२-२३ वर्षातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक संघटना म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यापाठोपाठ चेंबर ऑफ मराठवाडा फॉर इंडस्ट्रीज आणि अग्रिकल्चर (सीएमआयए) या औद्योगिक संस्थेचाही नुकताच पुणे येथील कार्यक्रमात त्याच संघटनेकडून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे कार्यकारी सचिव रवींद्र मानवतकर यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
ऑरिक सिटीसह मराठवाडा विभागात नवीन औद्योगिक गुंतवणूक वाढावी यासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या सीएमआयएने शासकीय स्तरावर मोठे प्रयत्न केले आहेत. त्याला यश येत असून अनेक मोठे उद्योगसमूह गुंतवणुकीसाठी ऑरिकचा विचार करत आहेत. भारतात 5 जी सेवेच्या विस्तारीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश करावा यासाठी केलेले प्रयत्न, राष्ट्रीय हरित लवादासमोर मांडलेली बाजू, उद्योगांना वीज दरात सवलत मिळावी, येथील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी संस्थेने काम केले.
या कार्याबद्दल सीएमआयए संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले. सामाजिक दायित्वातून कोविड काळात केलेल्या संस्थेच्या कार्याचीही दखल घेण्यात आली. विभागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी संस्थतर्फे करण्यात येणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.