आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. कराड यांचे विशेष प्रयत्न:सीएमआयएच्या मॅजिकला डिफेन्सचे इन्क्युबेटर सेंटर ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबरमध्ये सीएमआयए आणि मॅजिकच्या शिष्टमंडळाने अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन औरंगाबादला डिफेन्स इनोव्हेशन हब विकसित करण्याची मागणी केली होती. आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉ. कराड यांना पत्र पाठवून संरक्षण मंत्रालयाचे संलग्न इन्क्युबेटर सेंटर म्हणून सीएमआयएच्या मॅजिक संस्थेची निवड केल्याची माहिती दिली.

मराठवाडा विभागात संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळण्यासाठी ‘आयडेक्स’ सोबत करार करण्यात येणार आहे. या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील. संरक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होणार आहे, असे डॉ. कराड म्हणाले.

२०१६ पासून सुरू हाेते प्रयत्न : सन २०१६ पासून सीएमआयएच्या माध्यमातून डिफेन्स क्लस्टर विकसित करण्याचे प्रयत्न सुरू हाेते. आयडेक्स संलग्न इन्क्युबेटर म्हणून सीएमआयएच्या मॅजिकला मिळालेली मान्यता हे औरंगाबाद विभागाला संरक्षण उत्पादन आणि इनोव्हेशन हब विकसित होण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे, असे सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...