आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या सभेसाठी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मोठी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानुसार संध्याकाळी 6 वाजता त्यांचे औरंगाबादमध्ये आगमन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संभाजीनगरचा मुद्दा गाजणार
गेल्या काही दिवसात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेत सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली. यात त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला. यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की, शहरांचे नामांतर संभाजीनगर करावे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, त्यांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
बुधवार, 08 जून बुधवार रोजी सायं 06.00 वा. मुंबईहून औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार आहे. सायंकाळी 07.30 मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे रवाना होणार असून, 07.45 वा. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे आगमन होणार आहे. तर. रात्री 07.45 वा. मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना शाखेचा 37 वा वर्धापन दिनास उपस्थिती लावणार असून रात्री 08.45 वा.मोटारीने औरंगाबाद विमातनळाकडे प्रयाण आणि रात्री 09.05 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
भाजपकडून ही संभाजीनगरचा नारा
राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी देखील भाजपने संभाजीनगरचा उल्लेख केला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत काही घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपची सत्ता येत नाही तोपर्यंत औरंगाबादच्या नामांतराचा विषय विसरावा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत म्हटले होते. आता मुख्यमंत्री शिवसेनेच्या जुन्या घोषणेवर काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. सभेला अजून बराच वेळ असला तरी सांस्कृतिक मंडळावर गर्दी जमत असल्याचे दिसून येत आहे. गर्दी आणि संभाजीनगरच्या बॅनरबाजीनंतर आता सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.