आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाची मागणी:दोन्हीकडे युतीचे सरकार, आता तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रात आणि राज्यातही भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे आता तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, असा सल्ला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील 23 सप्टेंबर रोजी भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देणार आहेत.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बावनकुळे प्रथमच औरंगाबादमध्ये येत आहेत. बूथप्रमुखांच्या मेळाव्यानंतर ते सोशल इंजिनिअरिंग उपक्रमात विनोद पाटील यांच्यासह अतुल गदगडे, गंगाभय्या सिद्ध, मनोज जाधव, राजूसेठ लिंगायत या प्रभावी सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

यासंदर्भात बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका असलेले समीर राजूरकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ही केवळ सदिच्छा भेट आहे. भाजप प्रवेशाशी त्याचा काहीही संबंध नाही. आपल्या समाजात नेमके काय सुरू आहे. पदाधिकाऱ्यांची काय अपेक्षा आहे. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे काही योजना, सल्ला आहे का? याची माहिती बावनकुळे घेतील. विनोद पाटील म्हणाले की, ही मुळीच राजकीय भेट नाही. भाजपकडून जवळिक साधण्याचा विषयही असूच शकत नाही. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली, ही सकारात्मक बाब आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते तसेच मराठा क्रांती मोर्चातर्फे अशी मागणी करण्यात आली की, मराठा समाजाचे नोकरीतील स्थान नगण्य आहे, हे स्पष्ट होण्यासाठी जातीनिहाय जनगणना, प्रवर्गनिहाय नोकर यादी जाहीर करावी. मुख्यमंत्री कायद्यात टिकणारे आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे, असेही पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...