आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर संवर्धनाच्या कामाला झाला प्रारंभ:धूळ, पाण्यापासून संरक्षणासह झळाळी देण्यासाठी घृष्णेश्वर मंदिराला कोटिंग

औरंगाबाद / वैभव किरगत14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या संवर्धनास पुरातत्त्व खात्याच्या रसायन विभागाने प्रारंभ केला. दहा वर्षांच्या कालावधीनंतर गतवर्षी गाभाऱ्यासह सभामंडपाचे काम झाले. आता मंदिराच्या बाहेरील बाजूच्या कामास सुरुवात झाली.

या हेमाडपंती मंदिरात स्वयंभू पिंड आहे. या मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात आहे तसेच वरच्या भागावर दशावतार, शंकर-पार्वतीच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचा कळस सुवर्ण आहे. सभामंडप दगडी असून २४ खांबांवर आधारलेला आहे. देवाचा गाभारा १७ बाय १७ फूट असून यात माता पार्वती विराजमान आहे. १५ ते २० लाख रुपये खर्च करुन दीड ते दाेन महिन्यांच्या कालावधीत कोटिंंगचे काम पूर्ण केले जाईल. काम सुुरू असताना भाविकांच्या दर्शनात कुठलाही अडथळा येणार नाही.

पाऊस, धुळीचा दगडांवर परिणाम होतो. त्यामुळे चोहोबाजूंनी प्रोटेक्टिव्ह कोटिंग केले जाते. मंदिराच्या दगडातून पाणी झिरपते. त्यामुळे शेवाळ चढण्याची शक्यता असते. रसायनयुक्त लेपण केल्याने दीर्घकाळ मंदिराची झळाळी कायम राहील. या प्रक्रियेमुळे दगडांना संरक्षण मिळते. श्रीकांत मिश्र, उपअधीक्षक, रसायन विभाग

बातम्या आणखी आहेत...