आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात थंडी वाढणार:उत्तरेतील थंडीच्या लाटेने राज्यात गारठा वाढणार, राज्यातील पारा तीन ते पाच अंशांपर्यंत घसरला

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर भारतात बर्फवृष्टीसह थंडीची लाट येण्याचा अंदाज

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील पारा घसरला आहे. सोमवारी राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी घसरण दिसून आली. राज्यातील सर्वात कमी ८.६ अंश सेल्सियस तापमान चंद्रपूर येथे नोंदवण्यात आले. परभणी येथे ८.८ अंशांपर्यंत पारा घसरला. येत्या दोन दिवसांत उत्तर भारतात थंडीची लाट येण्याचा अंदाज असून त्यामुळे ऐन दिवाळीत राज्य गारेगार होण्याची शक्यता आहे.

आयएमडीनुसार, युरोपाकडून येणारे अतिथंड पश्चिमी वाऱे अर्थात पश्चिमी विक्षोभ येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमालयात धडकू शकतो. त्यामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टीसह थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. हेच थंड वारे राज्यात येऊन ऐन दिवाळीत राज्याला गारेगार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरी किमान तापमानात लक्षणीय घट दिसून आली. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला आहे.

राज्यातील पारा तीन ते पाच अंशांपर्यंत घसरला

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच प. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत सोमवारी सरासरी किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी घसरण दिसून आली. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वात कमी ८.६ अंश तर परभणी येथे ८.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे सरासरी किमान तापमानात ९ अंशांनी तर परभणीत ७ अंशांनी घसरण झाली.

राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील सोमवारचे किमान तापमान असे

जळगाव १३ (-३), महाबळेश्वर १४ (-१), नाशिक १३ (-२), पुणे १४ (-२), सोलापूर १४ (-५), औरंगाबाद १३ (-२), परभणी ८.८ (-७), उस्मानाबाद १४ (-२), अकोला १३ (-५), अमरावती १३ (-५) अंश सेल्सियस. (कंसात सरासरी किमान तापमानातील घसरण)

बातम्या आणखी आहेत...