आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा:पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या कॉलेजांची पुन्हा पडताळणी होणार, विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंचे सूतोवाच

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हे आहे ‘महा’ विद्यालय’ या मथळ्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. सेनेच्या मंत्र्यानी सेनेचेच मंत्री सत्तारांना २, तर कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांना चार कॉलेज मंजूर केले. एकूण १७ पैकी तब्बल १५ कॉलेजला कुलगुरूंनी (१२/७) त्यांच्या विशेषाधिकारात संलग्नता दिल्याचे प्रकरण ‘दिव्य मराठी’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर त्याचे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. विविध प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या अशा गलथान कारभारावर टीकास्र सोडणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्यवस्थापन परिषद सदस्य राहुल म्हस्के यांनी तर संलग्नताची शिफारस करणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांच्या समित्यांवर कारवाईची मागणी केली आहे. कुलगुरूंना मंगळवारी यासंदर्भात ते पत्र देणार आहे. दरम्यान कुलगुरूंशी यासंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बोलण्यास नकार दिला. प्र-कुलगुरू डॉ.श्याम शिरसाट म्हणाले, ‘ मंगळवारी विद्या परिषदेची बैठक आहे. बैठकीनंतर कुलगुरू ज्याप्रमाणे निर्देश देतील. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. प्रकरण गंभीर असून त्याची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर कुलगुरूंच्या आदेशाने पुढील निर्णय घेऊ.’ असेही डॉ. शिरसाट यांनी म्हटले आहे.

पायाभूत सुविधा नसलेल्या २२ पैकी १७ महाविद्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नता दिल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे. संलग्नतेसाठी रिपोर्ट देणाऱ्या तज्ज्ञ समित्यांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य राहुल म्हस्के यांनी केली आहे. मंगळवारी ( १५ मार्च) विद्या परिषदेच्या बैठकीतही यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...